Santosh Deshmukh Murder Case: भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, जेलमध्ये वाल्मिक कराड याला मटण आणि मोठ्या बॅग भरून वस्तू दिल्या जात आहेत. त्यामुळे तुरुंग प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ९ आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, आणि दहाव्या आरोपीवरही कलम ३०२ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी धस यांनी केली. तसेच, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पी.आय महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करावे. सायबर सेलचे दोन तज्ज्ञ एसआयटी मध्ये नेमावेत. कुणाचे कुणासोबत फोन कॉल झाले, याचा सखोल तपास व्हावा. पीएसआय राजेश पाटील याला आरोपी करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.