spot_img
अहमदनगरमुरकुटेंची बंडखोरी लंघेंना नडणार; नेवाशात कसे राहणार गणित पहा...

मुरकुटेंची बंडखोरी लंघेंना नडणार; नेवाशात कसे राहणार गणित पहा…

spot_img

नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत | शंकरराव गडाख यांच्या मताधिक्याचीच चर्चा
नेवासा | नगर सह्याद्री
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली. मुरकुटे यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका विठ्ठलराव लंघे यांना बसणार हे नक्की! ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्या मताधिक्याची चर्चा यातून पहिल्याच दिवशी सुरू झाली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांचा त्यांच्याच जिल्हा परिषद गटात संपर्क तुटलेला आहे. २००९ पासून त्यांचा तालुक्यात कोठेही संपर्क नाही. बेलपिंपळगाव गटात त्यांचे कोणतेही काम नाही. सातत्याने घुले यांच्या विरोधात ओरड करणार्‍या लंघे यांनी कारखान्याच्याच मुद्यावर पडद्याआड घुले यांच्याशीच हातमिळवणी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. कारखान्याचा राजीनामा त्यातूनच त्यांनी अनेकदा जाहीर करून देखील दिलेला नाही.

नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांच्याशी विठ्ठल लंघे यांची अंधारात युती असल्याचा आरोप मुरकुटे गटाकडून होत आहे. याउलट बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ला गडाख यांचा पराभव केला होता तसेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटत पराभव झाला. मुरकुटे यांचा तालुयात दांडगा संपर्क असून लंघे यांच्यापेक्षा मुरकुटे याना जनतेची पसंती असल्याचे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे.

मुरकुटे आणि लंघे या दोघांनीही उमेदवारीसाठी सलग तीन महिने मुंबई वार्‍या केल्या. राज्यातील महायुतीच्या नेत्यांना भेटताना दोघांनी एकाच वेळी भेटी घेतल्या. मात्र, शेवटच्या क्षणी विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी मिळताच बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. दुसरीकडे शंकरराव गडाख यांनी जवळपास सहा महिन्यापासून तालुका पिंजून काढला. त्यांच्या बैठकांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. वाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका घेतल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन केल्यानंतर गडाख यांनी सहा दिवसाच्या अंतराने दुसरा मेळावा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...