spot_img
अहमदनगरखून झाला साहेब! मृतदेह पोत्यात नेला; ११२ नंबरवर कॉल करणे भोवले? पोलीस...

खून झाला साहेब! मृतदेह पोत्यात नेला; ११२ नंबरवर कॉल करणे भोवले? पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
शहरातील हनुमाननगर गेट जवळ माझ्या भावाचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह पोत्यात घालून नेताना मी पाहिले आहे, त्याचा शोध घ्या, त्याचा तपास लागत नाही अशी खोटी माहिती डायल ११२ बर देणाऱ्याविरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनच्या डायल ११२ च्या एमडीटी मशिनवर कॉल आला. शहरातील हनुमाननगर गेटजवळ माझ्या भावाचा खून झाला आहे. त्याचा मृतदेह सापडत नाही. तरी तात्काळ पोलीस मदत पाठवा. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पो. कॉ. धोंगडे, साळुंके यांना हनुमाननगर येथे पाठविले. पोलीस तेथे गेल्यावर फोन करणाऱ्यास मोबाईलवर संपर्क केला. परंतू तो मोबाईल उचलत नव्हता. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली. तेव्हा येथे खुनाची घटना घडली नसल्याचे नागरिकांनी सांगितले

पोलिसांनी संबंधिताला वारंवार फोन केले, त्यानंतर संपर्क झाला असता त्याला पोलिसांनी गाठले. तेव्हा फोन करणारा परशराम रावसाहेब दिवे (वय ३१, रा. हनुमाननगर, कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले. परशरामने सांगितले, माझा सावत्रभाऊ संतोष आडांगळे याचा पहाटे तीन वाजता खून झाला आहे. त्याचा मृतदेह माऊ पवार याने गोणीत घालून घेवून जाताना मी पाहिले आहे.

त्यानंतर पोलिसांनी परशराम दिवे याची पत्नी रत्नमाला दिवे हिच्याशी संपर्क केला, तेव्हा तिने संतोष आडांगळे यांचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला तेव्हा, मी जीवंत आणि सुरक्षित असल्याचे आडांगळे याने सांगितले. त्यानंतर पोलिसांना खात्री झाली की, परशराम दिवे याने कुठलीही घटना घडलेली नसताना त्रास देण्याच्या उद्देशाने डायल ११२ वर खोटी माहिती दिली, त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परशराम दिवे विरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...