बीड । नगर सहयाद्री:-
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 50 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस, एसआयटी आणि सीआयडी अपयशी ठरले आहेत. त्यातच, करुणा शर्मा यांनी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, असा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे.
करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाल्मिक कराडने मला धनंजय मुंडे यांच्यासमोर मारहाण केली. माझ्या शरीराला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तीन वर्षांपूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते, तिथे हा प्रकार घडला होता.
याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मी जिल्हाधिकारी कार्यालयाला मागितले, पण ते अद्यापही देण्यात आलेले नाही.” त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे. त्याची हत्या झाली असावी. वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील, तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.