spot_img
अहमदनगरभर रस्त्यात शिक्षकाची हत्या! पत्नी व दोन मुले थोडक्यात वाचली? अहमदनगर मधील...

भर रस्त्यात शिक्षकाची हत्या! पत्नी व दोन मुले थोडक्यात वाचली? अहमदनगर मधील घटना..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर – कर्जत रस्त्यावर चिंचोली काळदातजवळ शिक्षकावर लाकडी दांडयाने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला. समवेत दुचाकीवर असलेली पत्नी आणि दोन मुले मात्र हल्ल्यातून बचावली. ही घटना सोमवारी (ता.१२) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली.

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स या संस्थेतील शिक्षक अशोक प्रभाकर आजबे (वय ३३, रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली कर्जत) हे पत्नी आणि दोन मुलांसह मिरजगाव-कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत होते. चिंचोली काळदात गावाजवळील लवणात आले असता मागून दुचाकीवर येणार्‍या आरोपींनी लाकडी दांडयाने डोयावर पाठीमागून जोरदार प्रहार केला. त्यात अशोक आजबे यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या मामाने खबर दिली.

या संदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली. यातील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यानी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. लवकरात लवकर आरोपींच्या मुसया आवळू, असे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; कुठे घडली घटना?

संगमनेर । नगर सहयाद्री:- शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना...

अहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...