spot_img
अहमदनगरमहापालिका राबवणार फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान; फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

महापालिका राबवणार फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान; फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

spot_img

प्रभगसामिती स्तरावर समित्या स्थापन करणार : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महानगरपालिकेने फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे. या अभियानात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभागस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. फलक लावणाऱ्या व्यक्ती, संस्थांसह फलकांवर ज्याचे फोटो असतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून शहरात फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मागील महिनाभरात १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्या व्यक्तींवर अधिक प्रभावी व कठोर कारवाई हाती घेण्यात येत आहे. नागरीक, राजकीय कार्यकर्ते, संस्था, संघटनांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा असे व इतर फलक विनापरवाना लावू नयेत. अशा पद्धतीने फलक लावणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांना अटकाव करण्यासाठी प्रभागसमिती स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. यात माजी नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश असणार आहे.

नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर करण्यासाठी, शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. यापुढे विनापरवाना फलक आढळल्यास फलक लावणारे व त्यावर ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे, तसेच शहरात विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, परवाना क्रमांकशिवाय फ्लेक्स छपाई करू नयेत, अशा सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी छपाई व्यावसायिकांना दिल्या आहेत. फ्लेक्स छपाई करताना फ्लेक्सच्या कोपऱ्यात परवाना क्रमांक टाकणे यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना क्रमांक न टाकता फ्लेक्स छपाई करणाऱ्या व्यावसायिकांवरही महानगरपालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...