spot_img
अहमदनगरमनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत 100 % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. मागील आठवड्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत. तर, चौघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. शास्तीमध्ये सवलत देण्यात आल्यावर आत्तापर्यंत 3.19 कोटींची थकबाकी जमा झाली आहे. 100 टक्के सवलतीसाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने मालमत्ताधारक सचिन गुलाब मोहिते यांच्याकडे मालमत्ताकराची 1 लाख 95 हजार 580 रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला. मालमत्ताधारक श्रीमती कमल रोहिदास माळी यांच्याकडे गाळ्याची 2 लाख 55 हजार 640 रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला होता. कारवाई करताच त्यांनी संपूर्ण रकमेचा चेक जमा केल्याने कारवाई मागे घेण्यात आली. मालमत्ताधारक शांतीलाल दत्तात्रय औटी यांच्याकडे मालमत्ता कराची 3 लाख 21 हजार 252 रूपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

24 जानेवारीपर्यंत पैसे न भरल्यास त्यांच्या राहत्या घराची खोली सील करण्यात येणार आहे. मालमत्ताधारक गिरवले यांच्याकडे मालमत्ताकराची 1 लाख 75 हजार 13 रुपये थकबाकी असल्याने त्यांचा गाळा सील करण्यात आला. मालमत्ताधारक श्रीनाथ नागरी पतसंस्थाकडे मालमत्ताकराची 2 लाख 42 हजार 510 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे पूर्ण कार्यालय सील करण्यात आले. नागपूर उपविभागमधील महाकालेश्वर सोसायटी गृहनिर्माण संस्थेेकडे 26 हजार 890 रुपये शास्ती वगळून थकीत असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले.

सावेडी प्रभाग समिती हद्दीतील मालमत्ताधारक रंजया बालाया शिरसुल संजय यांच्याकडे मालमत्ता कराची 94 हजार 430 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे दोन नळ बंद करण्यात आले. तसेच, मालमत्ताधारक अर्जुन पंडित घोडके यांच्याकडे मालमत्ता कराची 1 लाख 68 हजार 641 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. महानगरपालिका वसुलीसाठी सुरू असलेली कारवाई थांबणार नाही. थकबाकीदारांना शास्तीमध्ये सवलत देण्यात आली आहे. 100 टक्के सवलत घेण्यासाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे याचा लाभ घेऊन तत्काळ कर भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...