spot_img
अहमदनगरमुकुंदनगरमधील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा; आयुक्त काय म्हणाले पहा

मुकुंदनगरमधील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा; आयुक्त काय म्हणाले पहा

spot_img

टपऱ्या, ओटे, रॅम्प, पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त / अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
महानगरपालिकेने सोमवारी झेंडीगेट परिसरात अतिक्रमणे व कत्तलखान्याची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर मंगळवारी मुकुंदनगर व फकीरवाडा परिसरात कारवाई करण्यात आली. टपऱ्या, ओटे, रॅम्प, पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. झेंडीगेट प्रभाग कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

पथकाने मंगळवारी सकाळीच वनविभाग कार्यालय, मेराज मस्जिद रोड पासून कारवाई सुरू केली. मुकुंदनगसह फकीरवाडा रोडवरील अतिक्रमणेही हटवण्यात आली. टपऱ्या, ओट्यांची पक्की अतिक्रमणे, रस्त्यावर येणारे रॅम्प, पार्किंगसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, बेकायदेशीर फलक कारवाई करून हटवण्यात आले. महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये पत्राचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. जेसीबीच्या साहाय्याने ते जमीनदोस्त करण्यात आले.

महानगरपालिकेने महिनाभर अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमणे त्वरीत काढून घ्यावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. पुढील वेळापत्रक प्रमाणे कार्यवाही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

२७ फेब्रुवारी रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉन-आठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड, २८ फेब्रुवारी रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत, ३ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फरिस्ट ऑफिस ते बडी मस्जीद-पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप, ४ मार्च रोजी कोठला स्टॅण्ड-जीपीओचौक-चांदणी चौक-कोठी चौक-मार्केट यार्ड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-सक्करचौक-कायनेटीक चौक, ५ मार्च रोजी सक्कर चौक-मल्हार चौक-रेल्वे स्टेशन परिसर-कायनेटीक चौक, ६ मार्च रोजी कायनेटीक चौक-केडगांव-अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर, ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चाणक्य चौक-बुरुडगांवरोड-यश पैलेश हॉटेल-आनंदऋषी हॉस्पीटल-चाणक्य चौक-महात्मा फुले चौक ते कोठी, १० मार्च रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज-अमरधाम-नेप्तीनाका-कल्याणरोड-रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...