spot_img
अहमदनगरउत्पन्न वाढीसाठी महानगरपालिकेचा मोठा निर्णय; मार्च अखेरची डेडलाईन..

उत्पन्न वाढीसाठी महानगरपालिकेचा मोठा निर्णय; मार्च अखेरची डेडलाईन..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्व्हेक्षण करताना अडचणी येत आहेत. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी महानगरपालिकेत सर्वेक्षणाचा आढावा घेतला. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्वेक्षण करुन आवश्यक माहिती संकलीत करणे, मुल्यांकन व आवश्यक तांत्रीक सेवा संगणकीकरण करणे, विविध आज्ञावली विकसीत करुन इतर कामे करणे, यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून मे. सी. ई. इन्फो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यारंभ देण्यात आला आहे. मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे, जिओ टॅगींग, तसेच मालमत्तेच्या अंतर्गत मोजमापांसाठी, त्यांचे कारपेट व बिल्टअप क्षेत्र डीजीटल उपकरणाद्वारे मोजण्यात येणार आहे.

महानगरपालिकेचे वसुली लिपिक व मे. सी. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे काम केले जात आहे. त्यासाठी वसुली लिपिक व वसुली मदतनीस आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.खासगी संस्थेचे कर्मचारी असल्याने काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन सर्वेक्षणात अडथळे येत आहेत. मालमत्ताधारकांनी मालमत्ता सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. सर्वेक्षणाचे काम हे अहिल्यानगर महानगरपालिका विनामुल्य करत असून यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्वेक्षणामुळे सर्व मालमत्तांना कर आकारणी होईलच. मात्र, यामुळे मालमत्ताधारकांना आवश्यक असलेल्या मुलभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. या सर्व्हेक्षणाबाबत अथवा सर्वेक्षण कामास येणाऱ्या कर्मचारी, प्रतिनिधींबाबत कुठलीही तक्रार असल्यास राल_रपीीशवळषषारळश्र.लेा व राल.ीशळीळेप2सारळश्र.लेा या ई-मेल आयडी वर तक्रार करावी. याबाबत सहाय्यक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी विनायक गंगाधर जोशी यांच्याशी 9822076865 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...