शहर भाजपच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये मोठी सुधारणा करत भरघोस सुट देऊन देशवासियांना मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक व्यवस्थेत क्रांतिकारक ऐतिहासिक बदल घडवणारा आहे. अहिल्यानगर मधील सर्व नागरिकांनासाठीही हा निर्णय दिलासादायक असल्याने अहिल्यानगर महानगरपालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार यांच्या अभिनंदनचा ठराव करावा, अशी मागणी अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
अहिल्यानगरचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील या शिष्टमंडळात जीएसटीचे समितीचे संयोजक व जिल्हा सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस महेश नामदे, अजय चितळे, नीरज राठोड, मयूर ताठे, सोमनाथ जाधव, करण कराळे, अमोल निस्ताने, बाळासाहेब भुजबळ, गोपाल वर्मा, शिरीष जानवे, महेश गुगळे, चंदन बारटक्के, विजय गायकवाड, अजित कोतकर, बाबासाहेब सानप, महेश तवले, रामदास आंधळे, अजित बोरुडे, पुष्कर तांबोळी, संपत नलावडे, मनोज दुल्लम, बंटी डापसे, विशाल खैरे, पल्लवी जाधव, अर्चना बनकर, संगीता खरमाळे व दत्ता गाडळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
जीएसटी कर प्रणालीतील सुधारणा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. या सुधारणा देशाच्या आर्थिक विकासासाठी भक्कम पायाभूत ठरतील तसेच सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये शेतकरी वर्गासाठी कृषी उत्पादनाच्या खर्चात बचत होईल. शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री व पुरवठा सुलभ होऊन उत्पन्नवाढ व शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागेल. लघु व मोठ्या उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन मिळणर असून व्यवसाय सुलभतेला चालना मिळून नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. उत्पादन प्रक्रिया कमी खर्चिक व स्पर्धात्मक होईल.
मध्यमवर्गीय नागरिकांनाही या ऐतिहासिक निर्ण्यानामुळे मोठा फायदा होणार असून वस्तू व सेवांच्या किमतीत बचत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे देशाच्या सर्वागीण विकासात मोठे अमुलाग्र बदल होणार आहेत. याचा फायदा देशासह अहिल्यानगर मधील सर्व स्तरातील नागरिकांही होणार असल्याने महानगरपालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव करवा, अशी मागणी करण्यात आली आहे.