spot_img
अहमदनगरमहानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये;12 जणांवर गुन्हे दाखल, कारण काय?

महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये;12 जणांवर गुन्हे दाखल, कारण काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर 711 फलकांवर कारवाई करत 34 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्ते महानगरपालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. महानगरपालिकेने याची तपासणी करून गेल्या महिनाभरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

711 फलकांवर दंडात्मक कारवाई करून 34 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, महानगरपालिकेमार्फत शहरात तात्पुरते फलक लावण्यासाठी तीन दिवसांसाठी 134 फलकांना तात्पुरत्या परवानग्या दिल्या आहेत. त्या पोटी महानगरपालिकेला 86 हजार 364 रुपये शुल्क प्राप्त झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी नागरिक, संस्था, व्यवसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज करून व शुल्क भरून परवानगी घ्यावी. शहरात विनापरवाना फलक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात...

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने...