spot_img
ब्रेकिंगमहानगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा;'या' स्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

महानगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा;’या’ स्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

spot_img

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
शहरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाला आहे. हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात इतरत्र रस्त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

हसन शहा कब्रस्तान ते कोठी चौक व फरत हॉटेल ते कानडे मळा (जुना सोलापूर रोड) या दोन डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात ११५ पेक्षा अधिक घरे व १२ पेक्षा अधिक व्यावसायिक टपऱ्या अडथळा ठरत होत्या. या अतिक्रमणांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. सुमारे ४०० मीटर लांब व १२ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटारी, भुयारी गटार योजना व काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

अतिक्रमणामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले होते. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यात लक्ष घालून अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ११५ पेक्षा अधिक घरे व १२ पेक्षा अधिक टपऱ्यांची अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. रस्त्याच्या मंजूर असलेल्या कामात नागरिकांची अतिक्रमणे असल्यास ती काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...