spot_img
अहमदनगरमहानगरपालिकेचे मालमत्ताधारकांना आवाहन; 'तो' दंड टाळण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक

महानगरपालिकेचे मालमत्ताधारकांना आवाहन; ‘तो’ दंड टाळण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर १० टक्के सवलत दिली जाते. मात्र, यंदा ३१ मेपर्यंत सर्वसाधारण करावरील १० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. शहरातील ३१७२७ मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेऊन कर भरला आहे. सवलतीसाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४० अ नुसार करात एप्रिलमध्ये १०%, मे व जूनमध्ये ८% अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी १०% सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप केल्याने काहींना उशिरा बिले मिळाली. त्यामुळे नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही १० टक्के सवलत सर्वसाधारण करावर देण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षात २७ मे पर्यंत ३१७२७ मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला. त्यांना आत्तापर्यंत सुमारे ७० लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. सवलतीसाठी आता तीन दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व ३१ मे अखेरपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे. दरम्यान, ज्यांना बिले मिळाली नसतील अशा नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावे व सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...