spot_img
अहमदनगरथकबाकी वसुलीसाठी मनपा आक्रमक, गाळेधारकांना नोटीसा; न भरल्यास गाळे...

थकबाकी वसुलीसाठी मनपा आक्रमक, गाळेधारकांना नोटीसा; न भरल्यास गाळे…

spot_img

भाग्योदय – बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे ७८.४५ लाख थकीत / तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील महानगरपालिकेच्या गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज १ व फेज २ व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता केडगाव येथील भाग्योदय – बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार २० गाळेधारकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गाळेधारकांकडे ७८.४५ लाख रुपयांची थकबाकी असून, तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भाग्योदय व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांकडे ७८.४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच, बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ८१(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. बहुतांश गाळेधारकांचे करारनामे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे थकीत रक्कम तत्काळ न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यांनी ४८.९६ लाख रुपये जमा केल्याने त्यांची कारवाई टळली आहे. त्यामुळे तत्काळ थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पोलिस अधीक्षक म्हणून खमकी भूमिका बजावत असणाऱ्या सोमनाथ घार्गे यांच्या टीममध्ये...

गट, गणांची मोडतोड; कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले अहिल्यानगर |...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मोठी कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी १ वर्षासाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई राहाता । नगर सहयाद्री  ममदापुर (ता. राहाता)...

पत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

कोपरगाव / नगर सह्याद्री : कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी...