spot_img
ब्रेकिंगमुंबईकर घामाघूम; दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; असा आहे अंदाज...

मुंबईकर घामाघूम; दोन दिवस उष्णतेचे, पारा चढणार; असा आहे अंदाज…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यासह मुंबईचा आखाडा चांगलाच तापला आहे. ऐन दिवाळीत राजकारण्यांनी राजकीय फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे असणार आहेत. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पुढील दोन दिवस स्वत:ची काळजी घ्यायची आहे. पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके अशी परिस्थिती दोन दिवस असणार आहे. आधीच उन्हाच्या झळांनी मुंबईकरांची लाही लाही झाली आहे. त्यात आता उष्णता वाढणार असल्याने मुंबईकरांचा ताप वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दोन दिवस कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत असल्याने पहाटे गारवा जाणवतोय तर दुपारी उन्हाचा चटका सोसावा लागत आहे. वातावरणात शुष्क, गरम झळांचे प्रमाण वाढतच आहे. तसेच ही उष्णता दीर्घकाळ राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबईकर घामाघूम
मुंबईत बदलत्या हवामानामुळे आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने मुंबईकर घामाघूम होताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत हवामानात विविध बदल अपेक्षित आहेत. मुंबईत दृष्यमानता कमी झाली आहे. वातावरण धूरकट झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यातच आता दिवाळी असल्याने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इको फ्रेंडली फटाके वाजवण्याचं आवाहन केलं जात आहे.

नागपूरची ‘हवा’ काय म्हणतेय?
मुंबईपाठोपाठ नागपुरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. केंद्रीय प्रदूषण नियमंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 147 इतका नोंदवला गेला. शहरातील अंबाझरी परिसरातील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या वर्गात नोंदवण्यात आलीय. दिवाळीत सर्वाधिक फटाके फोडले जातात. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच फटाके फोडले जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून शहरात काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढला असून हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या श्रेणीत गेली आहे. शहरातील महाल, सिव्हिल लाईन्स आणि रामनगर येथील हवा अत्यंत प्रदूषित झाल्याचं दिसत आहे. गुणवत्ता निरीक्षण केंद्रावर या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आहे. अंबाझरी येथील केंद्रात मात्र हाच हवा गुणवत्ता निर्देशांक 209 इतका नोंदवण्यात आलाय. सिव्हिल लाईन्स येथे हा निर्देशांक 103, सर्वच हवा गुणवत्ता निर्देशांक केंद्रावर सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...