spot_img
ब्रेकिंगमुंबईच्या टॅक्सी चालकाला संपवलं; संगमनेरच्या प्रियकरासह प्रियसीला अटक

मुंबईच्या टॅक्सी चालकाला संपवलं; संगमनेरच्या प्रियकरासह प्रियसीला अटक

spot_img

Maharashtra Crime News: नवी मुंबईच्या उलवेमध्ये एका टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत टॅक्सी चालकाचा मृतदेह सापडला. पोलिस तपासातून या टॅक्सी चालकाच्या हत्याकांडाचे धक्कादायक कारण समोर आले. वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने या टॅक्सी चालकाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी या टॅक्सी चालकाची कार घेऊन फरार झाले. पोलिसांनी आरोपींना संगमनेरमधून अटक केली.

उलवे भागात राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपी तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड टॅक्सी चालकाची कार घेऊन पळून गेले होते. या तरुणाला आणि तिच्या बॉयफ्रेंडला संगमनेर येथून अटक करण्यात आली. संगमनेर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीनी सरेंडर करत घटनेची माहिती दिली तेव्हा ही सदर घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडेच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. उलवे पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याणसिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक केली. सुरेंद्र पांडेने रियाला आपल्या घरी आसरा दिला होता. याच दरम्यान सुरेंद्रने रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लिल विडिओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते.

प्रायव्हेट व्हिडिओद्वारे सुरेंद्र रियाकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. यावरूनच सुरेंद्र, रिया आणि विशाल यांच्यामध्ये वाद झाला असता घरातील हातोडीने सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात आघात केला आणि त्याची हत्या केली. सुरेंद्रची हत्या केल्यानंतर रिया आणि विशाल या दोघांनी पळ काढला. हत्येनंतर दोघे विशालच्या गावी संगमनेर येथे गेले आणि सर्व घटना कुटुंबियांना सांगितली.

कुटुंबियांनी दोघांनाही तात्काळ संगमनेर पोलिस ठाण्यात स्वतःला सरेंडर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रिया आणि विशाला यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनाक्रम सांगितला. संगमनेर पोलिसांनी सदर घटनेची माहिती उलवे पोलिसांना देत दोन्ही आरोपीना नवी मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी उलवे पोलिस आता अधिक तपास करत आहेत. या घनटनेमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जनता दरबारात तक्रारींचा पाऊस; आमदार काशिनाथ दाते आक्रमक, म्हणाले…

आमदार काशीनाथ दाते | तक्रारींचा पाऊस | तातडीने निराकारण करण्याचे आश्वासन पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर...

सावधान! जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट, कुठे काय परिस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान...

भोकला म्हणून कुत्र्याला बेदम मारहाण, मारहाणीत मृत्यू, पुढे घडले भयंकर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्त्याने जाताना कुत्रा भुंकल्याने चिडलेल्या व्यक्तीने झाडाच्या फांदीने त्याला बेदम झोडपले....

… तर पै. शिवराज राक्षेवरील बंदी मागे घेऊ; कुस्तीगीर परिषद

पुणे | नगर सह्याद्री:- अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती 2025 या स्पर्धेमध्ये पै. शिवराज राक्षेने...