spot_img
ब्रेकिंगमुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन...

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून ४०० किलोच्या आरडीएक्सच्या स्फोटाद्वारे मुंबई शहर हादरवले जाईल, असे या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले आहे. १४ पाकिस्तानी भारतामध्ये घुसल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. ४०० किलो आरडीएक्सने आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामध्ये १ कोटी लोकांचा मृत्यू होईल असा दावा देखील करण्यात आला आहे. ३४ गाड्यांमध्ये आत्मघाती बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली.

धमकीच्या मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की ‘लष्कर-ए-जिहादी’ म्हणून ओळख असलेल्या एका गटाने या धमकीची जबाबदारी स्वीकारली आहे. १४ पाकिस्तानी दहशतवादी आधीच भारतात घुसले आहेत असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत आणि राज्यभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व बाजूने तपास केला जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सोमवारी एका ४३ वर्षीय व्यक्तीला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश मधुकर रणपिसे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास पोलिस हेल्पलाइनवर फोन करून कळवा रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. नंतर पोलिसांनी याचा तपास करत आरोपीला अटक केली आणि हा धमकीचा फोन खोटा असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...