spot_img
ब्रेकिंगमुकुंदनगर खून प्रकरण: अवघ्या ८ तासांत आरोपी जेरबंद , पुण्यात पोलिसांनी 'असा'...

मुकुंदनगर खून प्रकरण: अवघ्या ८ तासांत आरोपी जेरबंद , पुण्यात पोलिसांनी ‘असा’ रचला सापळा…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री-

चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोकसून खून करणार्‍याला भिंगार कॅम्प पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले होते. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून काल, रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची (4 डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.

जिशान रूस्तम अली खान, शमशुद्दीन निजामुद्दीन खान, रेहान अब्दुलहक शेख, फैजान सोहराबअली खान हे चौघे मित्र एकमेकांची चेष्टामस्करी करत असताना शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास राग आल्याने त्याने मेडिकलमधील काऊंटरवरील कात्री घेऊन जिशान रूस्तमअली खान (वय 18, रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) याच्या पाठीत भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शनिवारी (30 नोव्हेंबर) सकाळी मृत्यू झाला.

मुकुंदनगर भागात जिलानी मेडिकल जवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना घडली होती. मयत जिशानचा भाऊ नसीबअली रूस्तमअली खान (वय 25 रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशुद्दीन निजामुद्दीन खान विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर शमशुद्दीन खान पसार झाला होता. तांत्रीक तपासाच्या आधारावर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दीपक शिंदे, संदीप घोडके, समीर शेख, प्रमोद लहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...