अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्यामध्ये गणित, विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी. त्याचबरोबर त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग पुढील जीवनात व्हावा. या प्रदर्शनामधूनच उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत. याच प्रमुख उद्देशाने रयत शिक्षण संस्थेचे श्री. तुळजाभवानी विद्यालय खडकी येथे शालेय गणित -विज्ञान, पर्यावरण, रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी झालेल्या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वेगवेगळ्या विषयावर आधारित उपकरणे तयार केली होती.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नगर सह्याद्री चे निवासी संपादक सुनील चोभे, उद्योजक मनीष भोसले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी केले. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रवीण कोठुळे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य बापूराव कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, माजी सरपंच शरद कोठुळे, सुनिल कोठुळे, माजी उपसरपंच आदिनाथ गायकवाड असे मान्यवर उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी माजी मुख्याध्यापक वाबळे यांनी विज्ञान शाप की वरदान याबाबत अनेक उदाहरणे देऊन सविस्तर माहिती दिली. प्रभारी मुख्याध्यापक चांगदेव आंधळे, शिक्षक दिपक दरेकर, जेष्ठ शिक्षिका छाया खेडकर, नीता जाधव, कल्याणी लोटके, अक्षय तिपोळे, रावसाहेब कोठुळे, ग्रंथपाल कोकाटे, वरिष्ठ लिपिक रावस मॅडम यांनी परिश्रम घेतले.
मान्यवर प्रदर्शनाची पाहणी करत असताना अनेक विद्यार्थ्यांनी उपकरणाची माहिती इंग्रजी भाषेतून दिल्यामुळे मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांचे अभिनंदन केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास विभाग प्रमुख श्रीमती जयश्री भोस यांनी विशेष असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रकाश करंदीकर यांनी केले.