अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज ९ ऑक्टोबर रोजी नगर शहरात सभा घेणार आहे. मुकुंदनगर येथील सीआयव्ही ग्राऊंडवर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ही सभा पार पडणार असून, या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमकडून ही सभा मोठ्या राजकीय डावपेचाचा भाग मानली जात आहे. सभेसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील, मुंबईचे जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
सभेसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह, मुंबईचे जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दीसह एमआयएमचे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती एमआयएमकडून देण्यात आली आहे.
खासदार ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात ही पहिलीच सभा असल्याने या सभेच्या माध्यमातून खासदार ओवैसींकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.