spot_img
अहमदनगरलेखी आश्‍वासनंतर खा.लंके यांचे उपोषण मागे ; 15 दिवसांत होणार आरोपाची चौकशी

लेखी आश्‍वासनंतर खा.लंके यांचे उपोषण मागे ; 15 दिवसांत होणार आरोपाची चौकशी

spot_img

अहदनगर । नगर सह्याद्री:
खासदार नीलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टचाराविरोधात सुरू केलेले उपोषण अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. नाशिकचे आयजी यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेे. 15 दिवसांत सर्व आरोपांची चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले.

दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट नाशिक परिक्षेत्राचे आयजी कराळे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर लेखी पत्र खासदार लंके यांना देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी दुपारी 1 वाजणाच्या सुारास खा.लंके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या. थोरात यांनी थेट आयजी कराळे यांच्यासोबत या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर 15 दिवसांच्या आत सर्व आरोपांची चौकशी करण्यात येईल व दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसे पत्र देखील खासदार लंके यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके , घनश्याम आण्णा शेलार यांच्या सह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत लिंबु सरबत घेत खा.डॉ निलेश लंके, योगीराज गाडे व बबलु रोहकले यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान खा.लंके यांना अशक्तपणा जाणावत असल्याने उपोषण स्थळी थेट सलाईन लावण्यात आले होते. त्यांची प्रकृती देखील खालवली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...