पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सरपंच संजय रोकडे यांनी वडगाव सावताळ ते गाजदीपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. उपोषणाला तोडगा निघत नसल्याने रोकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मार्गी लागला आणि रोकडे यांनी उपोषण मागे घेतले.
खासदार निलेश लंके यांनी भ्रमणध्वनीद्वारे सरपंच रोकडे यांच्याशी संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी जन सुविधा आणि नागरी सुविधा योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, जिल्हा नियोजन समितीत हा प्रश्न मांडून अतिरिक्त निधी मिळवण्याचेही त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर रोकडे यांनी उपोषण सोडले. यावेळी खासदारांचे बंधू दीपक लंके, पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, पारनेर गटविकास अधिकारी दयानंद पवार, टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रवींद्र राजदेव, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहन रोकडे, ज्येष्ठ नेते संजय लाकूडजोडे सर, ज्येष्ठ नेते बी. टी. खामकर, संदीप व्यवहारे, माजी चेअरमन दादाभाऊ रोकडे, भाऊसाहेब दाते, अशोक रोकडे सर, सर्जेराव रोकडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सरोदे, बाबासाहेब दाते, राजेंद्र भोसले, बाबासाहेब लोखंडचूर, अजय खोडदे, तुकाराम रोकडे, दीपक रोकडे, आप्पासाहेब रोकडे, नानासाहेब आहेर, देवराम जांभळकर, बाबाजी रोकडे, गणेश खंडाळे, दादाभाऊ शिंदे, सतीश तिखोळे, गो. या. रोकडे, विक्रम ठाणगे, संदीप रोकडे, सचिन जांभळकर, संतोष करगळ, भाऊसाहेब रोकडे, अर्जुन रोकडे, दत्तात्रय रोकडे, अजित रोकडे, अनिल रोकडे, सुनील रोकडे, ऋषिकेश रोकडे, आदेश साळवे, भाऊसाहेब शिंदे, मंगेश रोकडे, अर्जुन रोकडे, माऊली रोकडे, अर्जुन साळुंके, गौतम रोकडे, राजेंद्र रोकडे आदी उपस्थित होते. या यशस्वी मध्यस्थीमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.