spot_img
अहमदनगरखासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

खासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

spot_img

खा. लंकेंचा आंदोलनस्थळी मुक्काम । डॉक्टरांकडून उपोषणकर्त्यांची तपासणी
अहमदनगर । नगर सह्याद्री

नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खा. नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांकडून पोलिसांविरोधात तक्रारींचा अक्षरश। धो धो पाऊस पडला. दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. उपोषणकर्त्यांसह खा. लंके यांनी उपोषणस्थळीच मुक्काम केला.

नगर जिल्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले जाते. श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकार्‍याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली. पोलीसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले. ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी त्यांच्याकडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा खा. लंके यांनी यावेळी दिला. दुसर्‍या दिवशीही उपोषणास जिल्हाभरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, अ‍ॅड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव लंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, तक्रारदार यावेळी उपस्थित होते.

खा. लंके यांची डॉक्टरांकडून तपासणी
आमरण उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी खा. नीलेश लंके यांची जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर टीमने तपासणी केली. या तपासणीत खा. लंके यांचा ब्लड प्रेशर वाढल्याच तसेच शुगर लेवल वाढल्याची नोंद शासकीय डॉक्टरांनी केली. अशोक रोहोकले यांची शुगर वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...