मांडवगण येथे खासदार नीलेश लंके यांचा नागरी सत्कार व वही तुला
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करणार असून साकळाई पाणी योजनेचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले. दरम्यान मांडवगण ग्रामस्थांच्यावतीने गावामध्ये नॅशनल बँकेची व ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली आहे ही तातडीने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचा मांडवगण ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार लंके यांची वही तुला करण्यात आली. तसेच मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुल जगताप होते. यावेळी जगताप म्हणाले, खासदार लंके यांच्या माध्यमातून मतदारसंघातील तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, खादी ग्रामउद्योग चे संचालक अमित जाधव यांचा यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान मांडवगण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे सिद्धार्थ घोडके, योगेश देशमुख, माऊली कण्हेरकर, शिवाजी वाघमारे, टिल्लू मनसुके, पप्पू बोरुडे, स्वाधीन मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम देशमुख यांनी केले.