spot_img
अहमदनगरशिवस्वराज्य यात्रेत खासदार 'कोल्हे' यांच्याकडून माजी आमदार 'जगताप' यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला...

शिवस्वराज्य यात्रेत खासदार ‘कोल्हे’ यांच्याकडून माजी आमदार ‘जगताप’ यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार?

spot_img

Politics News: जिल्हा बँकेचे ( District Bank ) कर्ज घेण्यासाठी राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी पडले. सरकारच्या पक्षात सामिल झाले. पण श्रीगोंद्याचे माजी आमदार राहूल जगताप ( Rahul Jagtap) यांचा अभिमान आहे, त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही. अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe ) यांनी राहूल जगताप यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवार दि.२६ रोजी रात्री उशिरा आगमन झाले. परंतु सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अतुल लोखंडे, दीपकपाटील भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर, जिजाबापु शिंदे आदी उपस्थितीत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.

यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, राज्यातील अनेक कारखान्यांना थकहमी देण्यात आली. कर्ज बसत नसतानाही काही कारखान्यांना कर्ज देण्यात आले. पण कुकडी सहकारी साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनानियमात असतानाही कर्ज नाकारण्यात आले. ज्यांनी फाईल अडवली त्यांनी त्यांना काय हवे होते? हे सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला राहूल दादा जगताप यांचा अभिमान आहे. त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही. सरकारच्या सत्तेपुढे मान झुकवली नाही. आता आगामी विधानसभा निवडणूकीत ते दाखवून द्यायचे आहे. अनेक प्रलोभने येतील, अनेक मतमंतात्तरे होती, पण शेतकऱ्यांचे भले करणारे, महाराष्ट्राचा स्वाभीमान जपणारे, तरुणांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत यावे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा आणि त्यासाठी श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकुन द्या असे आवाहन कोल्हे यांनी केले.

जनतेच्या मनातीलच उमेदवार असणार; जयंत पाटील ( प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष)  
एकदा लाट आली की, पैशाला महत्व नसते. तुम्ही ते लोकसभेला दाखवून दिले. मतदारांच्या मनात जे असते तेच मतदार करून दाखवितात. लोकसभेत ते मतदारांनी दाखविले आहे. आम्हाल मानणाऱ्या नेत्यांचे कारखान्यांना कर्ज देताना खड्‌यासारखे बाजूला काढले. आता निगेटिव्ह मुद्दा राहिलेला नाही. पण शरद पवार यांनी आता कुकडीचा प्रश्न सोडला आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो आहे तोच येथील उमेदवार असेल, काळजी करु नका असे सांगत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राहूल जगताप यांना पसंती दिली.  

बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार
जिल्हा बँकेचे कर्ज कुकडी कारखान्याला मिळत होते. पण आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणून आम्हाला डावलले गले. पण आम्ही साहेबांची साथ सोडली नाही, आन सोडणार नाही. कुकडीची अडचण पवार साहेबांनीच सोडवली असून येत्या ५ आक्टोंबरपर्यंत सगळी थकीत देणी अदा करण्यात येणार आहे. आमच्यावर बुल डोजर जरी फिरवला तरी आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही. विधानसभेला ५० हजार मतांचे लिड घेवून महाविकार आघाडीचा उमेदवार जिंकेल असा
विश्वास माजी आमदार राहूल जगताप यांनी व्यक्त केला. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणावरून राडा; नेमका कसा घडला प्रकार पहा…

नगरसेवक पठारेंना पोलीस कोठडी | परस्परविरोधी फिर्याद | पठारेंचे १० लाख चोरले पारनेर | नगर...

पाणीचोरीतील पुणेकरांची दादागिरी थांबेल?; कुकडीसह साकळाई योजना दृष्टीक्षेपात

पाणीदार खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या सारिपाट / शिवाजी शिर्के मंत्रीमंडळाच्या विस्तारात...

संतोष देशमुख हत्या; बीडमध्ये मोर्चा : फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, कोण काय म्हणाले पहा…

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण...

तरुणावर धारदार शस्राने वार!; नालेगावात धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न...