spot_img
अहमदनगरजिल्हा हमाल पंचायतचे शहरात आंदोलन; 'या' आहेत प्रमुख मागण्या..

जिल्हा हमाल पंचायतचे शहरात आंदोलन; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 2025 भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष निमित्त राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेचा अमल सुरू झाला. त्याची आठवण ठेवण्यासाठी दरवष 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यंदाच्या 26 जानेवारीला त्याला 75 वर्षे पूर्ण झाली. मात्र सध्या प्रजासत्ताक हे संबोधनापुरते राहिले आहे.

प्रजासत्ताकाचा गाभा असणाऱ्या कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये अधिकृत, अनधिकृत पैशांचा प्रचंड वापर नुकताच झाला. निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम मशीन ची पद्धतही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाचे केंद्रातील सरकार यांनी घटनात्मक संस्था मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे. भल्या भुऱ्या सर्व मार्गाने विरोधकांची सरकारे पाडणे, त्यांच्या नेत्यांमागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लावणे. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव न मिळणे, शहरांचे बकालीकरण महिला, दलित, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असणारे अत्याचार अशा प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून धार्मिक विद्वेष पसरवणे.

अशा प्रकारांमध्ये सरकारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटना कार्यरत आहेत.प्रजासत्ताकाच्या 75 वर्षांचा फक्त उत्सव साजरा करणे यापेक्षा प्रजासत्ताकाची व त्याचा आधार असणाऱ्या राज्यघटनेची त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या मूल्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. अहिल्यानगर महात्मा गांधी यांच्या पुतळा येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले सहभागी झाले होते.

यावेळी कॉ बाबा आरगडे, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेखलाल, सचिव मधुकर केकाण, ऍड वैभव कदम, अनुरथ कदम, बहिरू कोतकर, रवींद्र भोसले, संजय महापुरे, लक्ष्मन वायभासे, मछिंद्र दहिफळे, राजू चोरमले, राहुल घोडेस्वार, बाबासाहेब गीते, रत्नाबाई आजबे, आदिनाथ चेके, शेख अब्दुल गनी, नवनाथ महानूर, श्रीमती कमल ढाणे, देविदास बनसोडे, नामदेव कुसळकर, मछिंद्र गिरी, अंबादास उगलमुगले, तबाजी कार्ले, आदी सह हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...