spot_img
ब्रेकिंग‘साकळाई’च्या हालचाली गतीमान, बुधवारचे आंदोलन स्थगित

‘साकळाई’च्या हालचाली गतीमान, बुधवारचे आंदोलन स्थगित

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
साकळाई उपसा सिंचन योजनेचा आराखड्याला आठ दिवसांत अंतिम मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा साकळाई कृती समितीने दिला होता. याबाबतचे निवेदन कृती समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले होते.

परंतु, राज्य सरकारच्या पातळीवर साकळाई योजना मंजुरीसाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तसेच योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही चालू आहे. प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्याची कार्यवाही चालू आहे. रस्तारोको आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्याने साकळाई कृती समितीने उद्याचे १४ फेब्रुवारीचे चिखली येथे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते.

आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा लोकशाही मार्गाने १४ फेब्रुवारीला चिखली (कोरेगाव, ता. श्रीगोंदा) येथे सकाळी साडेनऊला नगर रोडवर जुना टोलनायावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच रुईछत्तीसी येथे दि. १६ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता, नगर-सोलापूर रोड वर २५ फेब्रुवारीला दौंड-अहमदनगर रेल्वे लाईनवर सकाळी साडेनऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेेंडे, समाजसेवक भापकर गुरुजी, संतोष लगड, नारायण रोडे, रामदाम झेंडे, पुरुषोत्तम लगड, रोहिदास उदमले, सुदाम रोडे, बापूसाहेब गाडेकर, शिवराम लंके यांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला होता.

दरम्यान, प्रशासनाने योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही चालू आहे. प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल. रस्तारोको आंदोलन स्थगित करुन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्याने साकळाई कृती समितीने उद्याचे १४ फेब्रुवारीचे चिखली येथे आंदोलन स्थगित केले आहे. परंतु, येत्या काही दिवसांत साकळाईच्या आराखड्याला अंतिम मंजुरी न मिळाल्यास तीव्र आंदेालन करणार असल्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे साकळाई योजनेच्या आराखड्यास मंजुरी मिळते की नाही हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

खा. विखेंचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद
साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते हे पाठपुरावा करत आहेत. सोमवारी खा. विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत साकळाईच्या प्रशासकीय मान्यतेबाबत बैठक घेण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन साकळाईचे पुढील नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगणक रूममध्ये मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? नगर हादरलं

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या मुळा विभागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने...

मोठी खुशखबर! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं १९ हजार रूपयांनी स्वस्त..

मुंबई । नगर सहयाद्री दिवाळीच्या स्वागताला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा शुभदिन. या विशेष...

धक्कादायक घटना! आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Accident News: कळमेश्वर तालुक्यातील महाजन लेआउट परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली....

श्रीगोंद्यातील मलंग बाबा ट्रस्टच्या जागेवर अवैध धंद्यांनी घेतला आसरा!; कारवाईची मागणी

सरकारी मालमत्तेची तोडफोड, गुटखा विक्री जोमात; संभाजी ब्रिगेड आक्रमक श्रीगोंदा । नगर सहयाद्री  श्रीगोंदा शहरातील साळवण...