spot_img
ब्रेकिंगयात्रेच्या दिवशी गावावर शोककळा; मायलेकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

यात्रेच्या दिवशी गावावर शोककळा; मायलेकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
चांडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा (दि.२२) रोजी यात्रा उत्सव होता. दरम्यान, घरातील साफसफाई करतांना मायलेकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र हिरामण लोंढे, सखुबाई हिरामण लोंढे असे मायलेकांचे नाव आहे.

मंगळवार (दि.२२) रोजी सकाळी आठच्या सुमारास राजेंद्र हिरामण लोंढे घरावरील छत पाण्याने धुत होते. दरम्यान, त्याचा हात विजेच्या वायरला लागला असता त्यांना विजेचा धक्का बसला. जवळ असलेल्या त्यांच्या मातोश्री सखुबाई हिरामण लोंढे यांनी समोरचा प्रकार पाहत ओरडत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना देखील विजेचा धक्का लागल्यामुळे मायलेकाचा मृत्यु झाला. त्यांचा आवाज ऐकून घरातील इतरही माणसे छतावरती धावून गेली.

घडलेली घटना लक्षात आल्यावर त्यांनी विद्युत वायर कट करत वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर दोघा मायलेकांना ताबडतोब श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी उपचाराधी मयत घोषित करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावच्या यात्रेच्या दिवशी सदरचा प्रकार घडल्यामुळे शोककळा पसरली असून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...