spot_img
अहमदनगरपारनेर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांची मोटर सायकल रॅली

पारनेर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांची मोटर सायकल रॅली

spot_img

 

हिंदुत्ववादी विचारधारा पोहोचविण्यासाठी पारनेर येथे कार्यक्रम

पारनेर / नगर सह्याद्री –
हिंदुत्ववादी विचारधारा जागृत ठेवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पारनेर तालुक्यातील वाळवणे ते पारनेर या दरम्यान ५०० हून अधिक मोटर सायकलची भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली.
दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पवित्र श्रावण मासानिमित हिंदवी विचारधारा आयोजित हिंदू एकता रॅली व मेळावा अतिशय जल्लोषात पार पडला.
हिंदवी विचारधारेच्या वतीने ‘हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी पारनेर तालुक्यातील नागरिक मेळाव्यात सहभागी झाले होते.

श्रावण महिन्या निमित्त भैरवनाथ मंदिर वाळवणे या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करून भव्य हिंदू एकता रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीमध्ये ५०० हून अधिक मोटरसायकल घेऊन हिंदू युवक सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत सुपा हंगा या मार्गी रॅली पारनेर शहरामध्ये दाखल झाली. गणेश मंगल कार्यालय पारनेर या ठिकाणी रॅली ची सांगता झाली. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गीतांजली ताई झेंडे यांचे सुश्राव्य असे शिव शंभू चरित्र व्याख्यान सादर करण्यात आले. हंगा गावातील सॉफ्टवेअर इंजिनिअर गौरव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी मोठ्या संख्येने पारनेर तालुक्यातील सकल हिंदू युवक उपस्थित होता.

हिंदूंच्या संरक्षणासाठी यापुढच्या काळात लाठ्याकाठ्या घेऊन मारामाऱ्या करायची गरज नाही. परंतु बुद्धीच्या, लेखणीच्या बळावर या समाजाचे भले करण्यासाठी ‘हिंदू एकता’सारख्या संघटनांची अजूनही गरज आहे,

शिवशंभु व्याख्याता गीतांजलीताई झेंडे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत....

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

बीड / नगर सह्याद्री - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पाय...

‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण...

सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे 11 लाख वसूल; उपायुक्त म्हणाले, माफीचा लाभ घ्या,अन्यथा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत...