spot_img
ब्रेकिंग'मातोश्री समोर मराठा समाजाचे आंदोलन' अंबादास दानवे म्हणाले...

‘मातोश्री समोर मराठा समाजाचे आंदोलन’ अंबादास दानवे म्हणाले…

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून आज मातोश्रीबाहेर आंदोलन केले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आले.

मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिल्याचे समजताच अंबादास दानवे तातडीने त्याठिकाणी पोहोचले. यानंतर अंबादास दानवे हे स्वत: मराठा आंदोलकांना सामोरे गेले. तत्पूर्वी मातोश्रीवर ज्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे ते रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.

त्यानंतर अंबादास दानवे मातोश्रीसमोर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावासमोर गेले. तु्म्ही कोणाच्या सांगण्यावरुन इकडे आलात, मला माहिती आहे, असा थेट हल्ला अंबादास दानवे यांनी चढवला. अंबादास दानवे यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर आंदोलकांच्या जमावाने आपली बाजू मांडायला सुरुवात केली. आम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या घरासमोर नव्हे तर शरद पवार, नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन करणार आहोत, असे आंदोलकांनी अंबादास दानवे यांना सांगितले.

त्यावर अंबादास दानवे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे याबाबत काय करणार? तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जा, हा माझा सल्ला आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन याठिकाणी आले पाहिजे होते. फक्त चार-पाच जणांनी उद्धव ठाकरेंना भेटायला पाहिजे होते. मी साहेबांना भेटीबाबत विचारतो. पण तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन याठिकाणी आला असाल तर हे कळाले तर उद्धव साहेब तुम्हाला भेटणार नाहीत.

मराठा आरक्षणाबाबतची आमची भूमिका तुम्हाला माहिती नाही का? मी शिवसेनेचा नेता आहे. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मी मांडतो. मराठा आरक्षणाबाबतची आमची सुरुवाती पासूनची भूमिका स्पष्ट आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगताच मातोश्रीसमोरील आंदोलक काहीसे नरमले. त्यानंतर अंबादास दानवे यांनी मी उद्धव ठाकरे यांना विचारुन तुम्हाला कळवतो. पण भेटीसाठी फक्त चार-पाच जणांनाच आतमध्ये येता येईल, असे अंबादास दानवे यांनी आंदोलकांना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: आ. काशिनाथ दाते, खडकवाडीत नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी..

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे....