spot_img
अहमदनगरआईने फोडला टाहो; लस घेतल्यानंतर बाळाचा मृत्यू, अहिल्यानगर मधील घटना

आईने फोडला टाहो; लस घेतल्यानंतर बाळाचा मृत्यू, अहिल्यानगर मधील घटना

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लस दिल्यानंतर एका दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथे सदरची घटना घडली. चुकीची लस दिल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.एस. बांगर यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. पिंटु किरण आरणे असे बाळाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: पुणतांबा येथील गायत्री आरणे यांनी आपल्या दीड महिन्याच्या बालकास लसीकरणासाठी आणले होते. लसीकरण करून घरी गेल्यानंतर अर्धा तासाने बाळाची हालचाल मंदावली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत या बाळास उपचार करण्यासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात आई गायत्री आरणे घेऊन आली.बाळाची तपासणी केली असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. एस. बांगर यांनी त्यास मयत घोषित केले.

यावर बाळाची आई गायत्री आरणे हिने एकच टाहो फोडला. लसीकरण करणार्‍या आरोग्य सेविकांनी निष्काळजीपणे चुकीची लस दिली असे म्हणत सर्वांना धारेवर धरले. वैद्यकीय अधिक्षकासह आरोग्य कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाळाच्या आईसह नातेवाईकांनी केली. याबाबतची माहिती रुग्णालयाकडून राहाता पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी लसीकरण रजिस्टर, दिलेली लस व इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्र ताब्यात घेतले. बाळाचे शवविच्छेदन करणे, लसीची उच्चस्तरीय शासकीय लॅबमध्ये तपासणी करणे आवश्यक असून याकरिता बाळाला नातेवाईकासह शासकीय रुग्णालय अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले. सिव्हील सर्जन यांच्याकडून येणारा शवविच्छेदन अहवाल व लसीचा तपासणी अहवालानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी संगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...