spot_img
ब्रेकिंगराज्यात १२ लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभबंद? कशा ठरल्या अपात्र पहा

राज्यात १२ लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभबंद? कशा ठरल्या अपात्र पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. निवडणूक काही दिवसांवर असल्याने ज्यांनी अर्ज केले, त्या महिलांच्या अर्जाची निकषांच्या आधारे काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. दोन महिन्यांत जिल्ह्यातील साडेअकरा लाखाहून अधिक महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले.

पण, अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांचा बराच निधी या योजनेसाठी वळता करावा लागला. दुसरीकडे बारा लाखाहून अधिक महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असू शकते का, याचे उत्तर सरकार शोधू लागले आहे. आतापर्यंत राज्यात दोन कोटीपैकी १२ लाखांहून अधिक महिलांचा लाभबंद करण्यात आला असून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा लाभघेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ कमी केला आहे.

आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधारलिंक करून आयकर कडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्यस्तरावरुनच घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. त्यानुसार आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी अजूनपर्यंत झालेली नाही.

त्यामुळे आयकर विभागाकडून त्यासंबंधीची माहिती मागविण्यात आली असून आधार व पॅनकार्डच्या आधारे त्या कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला योजनेतून वगळण्यात येणार आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांकडे ही माहिती नाही. किंवा त्यांना त्यासंबंधीचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...