spot_img
अहमदनगरमुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल!

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल!

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
मुळा-भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाला. आज, सोमवारी सकाळपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असला तरी कोकणचा शेजार लाभलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस नव्हता. जूनच्या पूर्वार्धात धरणांचे पाणलोट क्षेत्रात जेमतेम पाऊस पडला.

पंधरा जूनपर्यंत घाटघर येथे अवघा 200 मि. मी. पाऊस पडला तर भंडारदरा येथे फक्त 70 मि. मी. पावसाची नोंद झाली होती.मंगळवारी सकाळपासून मात्र तालुक्यात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात मोसमी पावसास सुरवात झाली आहे. मुळा- भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. झाकोळलेले आकाश, अंतरा अंतराने येणाऱ्या पावसाच्या सरी, हवेत निर्माण झालेला गारठा, धुक्यात हरवणारी पर्वत शिखरे हे वैशिष्ट्‌‍यपूर्ण पावसाळी वातावरण पश्चिम भागात निर्माण झाले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाळी वातावरण निर्माण झाले असून पावसाच्या हलक्या सरी मधून मधून येताहेत. भंडारदरा धरणात सध्या 22.15 टक्के म्हणजे 2 हजार 445 दलघफू. पाणी शिल्लक आहे तर निळवंडे धरणात 2 हजार 587 दलघफू (31.06 टक्के) पाणीसाठा आहे. घाटघर येथे आज सकाळी 54 मि. मी. पावसाची नोंद झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिर्डीतील गुटख्याच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; मुद्देमालासह आरोपी गजाआड

शिर्डी । नगर सहयाद्री जिल्ह्यात गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक...

ICCचा नवा फॉर्म्युला, टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, टीम इंडिया मात्र…

ICC Ready for 4 Day Test Cricket News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आल्यापासून...

स्वबळावर की महायुती याचा निर्णय आमदार घेणार?; भाजप जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा निवडून...

गजानन कॉलनीत भयंकर प्रकार!, तलवार, कोयते अन्..

युवकाविरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री नवनागापूर येथील गजानन कॉलनीत सोमवारी सायंकाळी तलवार व कोयता...