spot_img
ब्रेकिंगमान्सून पुन्हा सक्रिय; मुंबईला यलो, कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी

मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबईला यलो, कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट तर दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना आणि मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या रहिवाशांनीही सतर्क रहावे.

गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सध्या दडी मारली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आता मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने आता पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या काळात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसणार
मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून
या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून होईल, असा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजना; ऑगस्टचा हप्ता गणेशोत्सवाच्या आधी येणार…?

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थींना दरमहा १५०० रुपये राज्य सरकारकडून दिली...

नगर शहरातील वाहतुकीत बदल, वाहनधारकांनो बाहेर पडण्यापूर्वी बदल समजून घ्या

Traffic Diversion News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा...

बोल्हेगावात राडा; तरूणावर कोयत्याने सपासप वार, कारण काय

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- जुन्या बोल्हेगाव रस्त्यावरून घरी जात असताना सावेडी परिसरातील एका तरूणावर तीन...

आज शुभ घटना घडणार, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, तुमची रास काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून...