spot_img
महाराष्ट्रघरात पैसास टिकत नाही? गुरुवारी करा 'या' झाडाची पूजा!

घरात पैसास टिकत नाही? गुरुवारी करा ‘या’ झाडाची पूजा!

spot_img

Vastu Tips: अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहेत. असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी-देवता वास करतात. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात. ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात.

गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला केळीच्या झाडाशी संबंधित काही खास उपाय सांगणार आहोत.

आर्थिक संकट होईल दूर
कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापालट करू शकतो. यासाठी केळीच्या झाडाची मुळे घरी आणा. यानंतर ते मुळ गंगेच्या पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा. नंतर घरामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ ठेवा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात-
जर आपल्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असल्यास आणि आपल्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण एखाद्या ज्योतिषाला विचारून बृहस्पती देवाचे उपवास करावे आणि केळीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्यानं आपल्या कुंडलीत असलेले गुरु ग्रह बळकट होतील, आणि लग्नातील अडथळे दूर होतील.

केळीच्या झाडा खाली दिवा लावा-
श्री विष्णू पिवळे कपडे घालतात. म्हणून त्यांना पीताम्बरधारी देखील म्हणतात. गुरुवारी पिवळे कपडे घालून केळीच्या झाडा खाली दिवा लावावा. असे केल्यानं श्री विष्णूंची कृपादृष्टी मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...