spot_img
ब्रेकिंगमोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा...

मोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा…

spot_img

पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात: सुजय विखे पाटील। माता-भगिनींसाठी मोफत मोहटा देवी दर्शनाला टीव्ही सेंटर वरून प्रारंभ
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
माजी खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहे. त्यातच आज सुजय विखे पाटील यांनी मोहटा देवी यात्रेवरून लंके यांचे नाव न घेता टीका केली आहे.
विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे योगेश सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळींनी कुठल्याही पद नसताना आपल्या शब्दावर ठाम राहून राजकीय स्पर्धां न ठेवता अकराव्या वर्ष मोहटा देवी चे दर्शन नवरात्रात माता भगिनींना घडावे यासाठी त्यांना घेऊन जात आहे. त्यांचे हे आयोजन अभूतपूर्व आहे. अनेक लोक असे आहेत पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात, पदावर आल्यावर यात्रा बंद करतात.

पण माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता अशा यात्रा थांबवत नाही. त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. त्याला व त्याच्या मंडळाला मी धन्यवाद देतो असे कौतुक माजी खासदार सुजय विखे यांनी केले. अप्रत्यक्षरीत्या मोहटा देवी मोफत दर्शन यात्रा बंद केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांना टोला मारला.

सावेडीतील टिव्ही सेंटर, येथील विघ्णहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश सोनवणे पाटील हे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम कायम राबवित असतात. गेली 10 वर्षे ते परिसरातील महिलांना मोहटा देवी दर्शन घडवीत आहे. त्यांच्या या 11 वषचा दर्शनाचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी धनंजय जाधव, अनिल बोरुडे, नितीन शेलार, महेश गुगळे, हर्षल बोरा आदींसह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.रोज माता भगिणींना दर्शन घडविणार असून या यात्रेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...

गुन्हेगारांना अटक करुन फाशीची शिक्षा द्या; कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या...