spot_img
अहमदनगरPolitics News: मोदी सरकार औट घटकेचे; जयंत पाटील सरकारवर बरसले? राष्ट्रवादीची शिवस्वराज्य...

Politics News: मोदी सरकार औट घटकेचे; जयंत पाटील सरकारवर बरसले? राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज ‘या’ गावात!

spot_img

Politics News: मोदींचे सरकार औट घटकेचे असून येत्या पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार आणी चंद्राबाबू त्यांची साथ सोडतील. केंद्रात सुद्धा विरोधी पक्षाची सत्ता येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी व्यक्त केला आहे.

निघोज येथे शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर निघोज व परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते व मान्यवर यांनी फटायांची आतषबाजी करीत व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करीत जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार राहुल जगताप, राणीताई लंके, अर्जुन भालेकर, मेहबूब शेख, वसंत कवाद, अ‍ॅड. राहुल झावरे, शिवाजीराव लंके आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या सहकारी पक्षांची जागा जनतेने दाखवून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. म्हणून शिंदे सरकार अव्वाच्या सव्वा योजना राबवून तिजोरी खाली करीत आहे. विविध योजना आणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांचा संरक्षणाबद्दल पाऊल उचलले जाईल. त्यासाठी कायद्यात बदल केला जाईल. विधानसभेसाठी खासदार लंके हे ज्या उमेदवाराचे नाव सांगतील तोच उमेदवार आमदार होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कांद्याचे भाव एकीकडे वाढले असताना परदेशातून कांदा आयात करीत काद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दूसरीकडे दूधाला भाव नाही यासाठी खासदार नीलेश लंके यांनी आंदोलन केले. मात्र फक्त आश्वासन देण्याचे काम सरकार करीत आहे. लाडकी बहीण योजना कशीही असू मात्र आमची लाडकी बहीण राणीताई लंके याच आहेत.

त्याच तुमचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूकीत विखे कुटुंबाने मतदारसंघातील जनतेला फार त्रास दिला. माझा अपघात करण्यासाठी सुद्धा त्यांनी षडयंत्र रचले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा एक लाखाच्या मताधियाने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच ठकाराम लंके यांनी केले. कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...