spot_img
आर्थिकमोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा

मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? वाचा

spot_img

नवी दिल्ली : नगर सह्याद्री
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.

कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या.

काय स्वत होणार?
सोनं, चांदी स्वस्त होणार
सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी स्वस्त
इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
सोलार सेट स्वस्त होणार
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
पीवीसी फ्लेक्स बॅनर
विजेची तार

काय महाग होणार?
प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार
प्लास्टीक उत्पादने महाग होणार

कॅन्सरची औषधे स्वस्त होणार
अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरच्या औषधावरील आयार कर करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, एक्स-रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. यानंतर देशात कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होतील.

कृषीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. यातून शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जाणार आहे. आगामी वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.

पीएम मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट
मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली. पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...