अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राहाता तालुक्यातील एका गावातील महिला शहापूर (ता. अहिल्यानगर) येथे आपल्या मुलीसह आईला भेटण्यासाठी गेलेल्या असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला करून विनयभंग केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पीडित महिलेने 24 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
प्रताप सौदे, जया प्रताप सौदे, शारदा प्रताप सौदे, सीमा बबलु जावळे, वर्षा (पूर्ण नाव नाही), बबलु जावळे, विक्की बबलु जावळे, संजय लोखंडे, ललीत वाल्मिकी, सुवर्णा संजय लोखंडे, राणी, काजल (पूर्ण नाव नाही, सर्व रा. कान्हेगाव, ता. राहता) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी या आपल्या मुलीसह त्यांच्या आईला भेटण्यासाठी शहापूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपींनी एकत्रित जमवुन फिर्यादी व साक्षीदार यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बबलु जावळे व विक्की बबलु जावळे यांनी फिर्यादीच्या मुलीचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या भावाला व बहिणीला देखील संशयित आरोपींनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बी. बी. अकोलकर करत आहेत.