spot_img
महाराष्ट्रमनसे विधानसभेच्या 200 ते 225 लढणार, ठाकरेंच्या प्लॅन

मनसे विधानसभेच्या 200 ते 225 लढणार, ठाकरेंच्या प्लॅन

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्मान सेना विधानसभा निवडणुकीत 200 ते 215 जागा लढवणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे. एका वृत्त वहिनीला प्रतिकीया दिली
प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरेंनी पर्वा आमच्या मेळाव्यात जाहीर केलं की आपण 200 ते 225 जागा लढवू. हा निर्णय जर साहेबांनी घेतला असले तर आम्ही कार्यकर्ते त्या दृष्टीने तयार आहोत. जातीनिहाय आरक्षणाला माझ्या पक्षाचा विरोध आहे. आमचं मत आहे की, जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण असावे. आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने सुटेल. सत्तेतील आणि विरोधातील लोकांना आरक्षण मान्य आहे, तर अडलं कुठं असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला आहे.

आम्ही मराठवाड्यातले आहेत. आमच्याकडे कासीम रिझवी नावाचा रझाकार होता. महाराष्ट्रातील मुस्लीमांचे हे कासीम रिझवी होते. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांबाबत खूप प्रेम आहे आणि मुस्लिमांनाही उद्धव ठाकरेंविषयी प्रेम आहे. त्यांचं प्रेम फक्त उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतात म्हणून आहे, असंही प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती अपयशी ठरली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी 200-225 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.

मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणाऱ्या बाबत देखील चर्चा आहे. मात्र 2014 आणि 2019 विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...