मनविसे ‘राजगड’ संपर्क कार्यालय उद्घाटन
अहमदनगर / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी नगर शहर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते दिल्ली गेट सिद्धी बागे जवळ नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘राजगड’ या मनविसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन सोहळा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.
दौऱ्याची अधिक माहिती देताना सुमित वर्मा यांनी सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे त्यांचे बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता नगरमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत तारकपूर बस स्थानका जवळील हॉटेल व्ही स्टार येथे मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि अभिनंदन सोहळा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता दिल्ली गेट सिद्धी बागे जवळील जाधव हाईट्सच्या दुसरा मजल्यावर नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘राजगड’ या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना सर्व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.