Politics News: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता रोहित पाटील यांनी आज सकाळी अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पाटील हे आज सकाळी विजयगड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध प्रकारची कामं आणि सदिच्छा भेट म्हणून त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे कारण सांगितले जात आहे. रोहित पवार यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे आता चर्चा होऊ लागली आहे.
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी देखील आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीआधी सलील देशमुख यांनी सांगितले की, ‘अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि मी काही कामांच्यासाठी आलो आहे. त्यांनी वेळ दिला तर भेटू. मी मविआचा उमेदवार होतो. जनतेने दिलेला कौल मी मान्य केला. चर्चा होत असते. पण मला तसं काही होईल असं मला वाटत नाही. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदेंनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे.