spot_img
ब्रेकिंगआमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

spot_img

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | …तर भाजपा स्वबळावर
सुनील चोभे | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीत राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नेते, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दारुण पराभव केला. कृषि उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकहाती मिळविले वर्चस्व. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता आल्याने जिल्ह्यासह नगर तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. आगामी तीन महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वच गट-गणांबाबत नियोजन सुरु केले असून पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.

सन 2006-2007 च्या काळात तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध म्हणून काँग्रेसचे माजी खासदार स्व. दादापाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी एकत्रित नगर तालुक्यात महाविकास आघाडीची मोट बांधली. 2007 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नगर तालुका महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. कर्डिलेंच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर पहिल्यांदा भगवा फडकला. 2012 मध्ये नगर तालुका मविआमध्ये फूट पडली.

शिवसेना-भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी लढत झाली. या लढतीत पंचायत समितीवर शिवसेना-भाजपाची सत्ता आली. 2016 मधील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची पुन्हा नगर तालुका मविआची एकजूट झाली. पंचायत समितीच्या 12 पैकी 8 जागा जिंकत पंचायत समितीवर पुन्हा झेंडा फडकविला. तर जिल्हा परिषदेच्या सहा पैकी पाच जागा जिंकल्या. एका जागी माधवराव लामखडे विजयी झाले. लोकसभा निवडणुकी अगोदर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नगर तालुका मविआला पराभवाला सामोरे जावे लागले.

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची मुदत 21 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकराज आहे. दरम्यान, प्रशासनाने निवडणुकीची तयारीही केली, त्यासाठी आरक्षण, गट-गण रचना करण्यात आली परंतु ओबीसी आरक्षणाचा व गट-रचनेबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने याचिका न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावर अंतिम सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी तयारी सुरु केली आहे.

संदेश कार्लेचा जय महाराष्ट्र मविआला ठरणार अडचणीचा
संदेश कार्ले यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली. शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाच्या माध्यमातून नगर तालुक्यात शिवसेना घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. गाव तेथ शाखा स्थापन केल्या. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या कार्ले उपजिल्हाप्रमुख पदावर आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, सभापती, दोनदा जिल्हा परिषद सदस्य पद भोगले आहे. विधानसभा निवडणूक त्यांचा विचार न केल्याने ते नाराज असल्याचे बालले जात असून लकवरच ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करतील असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे. तसेच नगर तालुका महाविकास आघाडीत कार्ले यांना महत्वाचा धटक मानले जात होते. कार्ले मविआतून बाहेर पडल्यास मविआची मोठी अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

लंकेंच्या पराभवामुळे समर्थक अस्वस्थ
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड मतदारसंघात लंके यांना चांगले मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीतही दक्षिणेत लंके फॅक्टर चालेल असे बोलले जात होते. परंतु, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात खा. लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लंके यांच्या पराभवामुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नगर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खा. लंके कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

22 तारखेच्या सुनावणीकडे इच्छुकांचे लक्ष
जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सुमारे तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. ओबीसी आरक्षण, गट-गण रचनेच्या मुद्द्यावर न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आत्तापर्यंत निवडणुका होवू शकलेल्या नाहीत. आरक्षण, गट-गण रचनेसंदर्भात न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तीन महिन्यात घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले असल्याने इच्छुकांचे लक्ष गट-गणासह आरक्षणाकडे लागले आहे.

हराळांचे आरोप कार्ले समर्थकांच्या जिव्हारी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख यांनी अपक्ष उमेदवारी केली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ यांनी संदेश कार्लेंनी विखेंचे टेंडर भरले असल्याची टीका केली. याच टीकेमुळे कार्ले समर्थकांमध्ये हराळ यांच्याविषयी प्रचंड रोष आहे. हराळ यांच्या वाळकी गटात कार्ले यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कार्ले समर्थ टीकेचा वचपा काढतात की कसे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...