spot_img
अहमदनगरआमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; 'त्या' सुविधामुळे तरुण वर्गामध्ये मोठा...

आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; ‘त्या’ सुविधामुळे तरुण वर्गामध्ये मोठा आनंद!

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवाकडे वाटचाल करणाऱ्या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या असून नागरिकांच्या सोयीकरता संगमनेर मध्ये स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

आरटीओ शिबिर कार्यालयाबाबत माहिती देताना आ.सत्यजित तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात शेती, सहकार ,शिक्षण, व्यापार यामुळे आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. याचबरोबर घरोघरी दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठी संख्या आहे.

किंबहुना राज्यामध्ये सर्वाधिक टू व्हीलर असलेला तालुका म्हणून संगमनेरची ओळख आहे.वाहन व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या तालुक्याकरता स्वतंत्र प्रादेशिक आरटीओ कार्यालय व्हावे आमदार बाळासाहेब थोरात यांची मोठी इच्छा होती याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी या ऑफिस च्या मागणीसाठी मुख्यमंत्री नामदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला असून आता नवीन आरटीओ ऑफिस हे फक्त जिल्हा स्तरावर मंजूर होत असल्याने यातून मार्ग काढत संगमनेर करता कायमस्वरूपी शिबीर कार्यालय मंजूर केले आहे. विविध वाहनांची पासिंग, त्याचप्रमाणे लर्निंग लायसन, परमनंट लायसन याकरता नागरिकांना श्रीरामपूरला जावे लागत होते .

नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता या नवीन शिबिर कार्यालयामुळे ही सर्व कामे संगमनेरातच होणार असल्याने आता नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हे कार्यालय जुने पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सुरू होणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून. या नवीन मंजूर झालेल्या शिबिर कार्यालयामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक व तरुण वर्गामध्ये मोठा आनंद निर्माण झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...