spot_img
अहमदनगरआमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव बाजार समितीच्या बारा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीचे उपसभापती म्हणून वराट यांची चिठ्ठीवर निवड झाली होती. तालुक्यातील उरली सुरली महत्त्वाची संस्था आ. रोहीत पवार गटाकडून गेली आहे. आ. रोहीत पवार यांना हा धक्का असला तरी उपसभापती कैलास वराट हे विखे गटाचे म्हणून परिचित आहे. अविश्वास ठराव दाखल करून सर्व बारा संचालक सहलीला रवाना झाले आहेत.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती ची निवड १६ मे २०२३ रोजी झाली होती. बाजार समितीमध्ये आ. रोहित पवार गटाचे नऊ व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे नऊ संचालक निवडून आले होते. त्यावेळी सभापती व उपसभापती निवडणुकीत दोघांना समान नऊ मते मिळाल्यामुळे ईश्वरी चिट्ठीने प्रा. राम शिंदे यांचे समर्थक शरद कार्ले विजयी झाले तर उपसभापती कैलास वराट हे पण ईश्वरी चिठ्ठीवर विजयी झाले होते.

मागील दोन वर्षांमध्ये बाजार समितीचा कारभार पाहताना सभापती शरद कार्ले यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आ. रोहीत पवार व्यतीरीक्त अज्ञात शक्ती या संचालका च्या माघे असल्याने अनेक निर्णय घेण्यात अडथळा होत असे. सभापती शरद कार्ले यांनी रोहित पवार गटाचे अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा व नारायण जायभाय या तीन संचालकांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन मत परिवर्तन केले तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी सदर संधी साधत अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा शुक्रवारी जामखेड तालुक्यात झालेला दौरा बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

बारा संचालक सहलीला रवाना
सभापती शरद कार्ले, अंकुश ढवळे, नारायण जायभाय, राहूल बेदमुथा, डॉ. गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, डॉ. सिताराम ससाणे, विष्णू भोंडवे, रवींद्र हुलगुंडे, सचिन घुमरे, नंदकुमार गोरे , गौतम उत्तेकर हे सर्व १२ संचालक सहलीला रवाना झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहर हादरलं! पती-पत्नीचे आढळले मृतदेह, वाचा प्रकरण

संगमनेर । नगर सहयाद्री: उपनगरातील इंदिरानगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. ही घटना रविवारी समोर...

धक्कादायक! फिर्यादीच निघाले आरोपी; विखेंचे बॅनर फाडणारे जेरबंद

शिर्डी । नगर सहयाद्री:- शहरातील लक्ष्मीनगर परिसरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे...

२१ वर्षांच्या नर्तिकेच्या नादात ३५ वर्षांचा नेता संपला!, कारमध्ये आढळला मृतदेह? शहरात खळबळ..

Maharashtra Crime News: मगळवारी सकाळी एका तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ऑगस्टचा हप्ता खटाखट जमा करणार, वाचा अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक...