श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घातले आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली असून उद्या मेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
नुकत्याच काही दिवसापूर्वी शिर्डी येथे पक्ष निरीक्षकांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. दरम्यान यावेळी काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आला होता. तसेच आमदार कानडे यांचा विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंदोलन देखील केलं होत. तेव्हापासूनच काँग्रेस पक्षात अंतर्गतच दोन गट झाल्याचं दिसुन येत होत. अखेर काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली.
त्यामुळे नाराज झालेले आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घातले आहे. उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कानडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे महायुतीतील शिंदे गट व भाजपच्या इच्छुकांना मोठा धक्का बसणार आहे.