आ. काशिनाथ दाते | पारनेर राष्ट्रवादीची बैठक
पारनेर | नगर सहयाद्री
विधानसभा निवडणुकीत निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटात चांगले मताधिक्य मिळाल्याने आमदार होण्याची संधी मिळाली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिल्लीतील राजकीय दबदबा वाढण्यासाठी सर्वाधिक संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे सभासद व्हा, असे आवाहन आ. काशिनाथ दाते यांनी केले आहे.
शिव सप्ताह निमित्ताने पक्षाचे सभासद वाढवीण्याचे धोरण पक्षपातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी घेतले आहे. या सुचनेनुसार आ. काशिनाथ दाते व पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत याच्या वतीने सोमवार दि. 24 रोजी दुपारी पाच वाजता अळकुटी व सायंकाळी सात वाजता निघोज येथील नंदन लॉन्स येथे पारनेर तालुका राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद होते.
निघोज येथील बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, जिल्हा सरचिटणीस ॲड. बाळासाहेब लामखडे, महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लंके, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय लाळगे, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रावडे
मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, अनिल लंके, विठ्ठलराव कवाद, युवा नेते रमेश वरखडे, वड शिवाजीराव सुकाळे, माजी सरपंच पांडुरंग येवले, संचालक शांताराम कवाद, शिवराज कदम, राजेंद्र ब्राम्हणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लंके यांनी केले तर रोहिदास लामखडे यांनी आभार मानले.
सुधामती कवाद यांच्या कामाचे कौतुक
महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद यांनी बैठकीसाठी सर्वाधिक महिलांना उपस्थीत ठेवले. तसेच सर्वांनाच व्यक्तीगत संपर्क करुण बैठकीस उपस्थित राहाण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केलयबद्दल आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई निंबाळकर यांनी कवाद यांचे कौतुक केले.
निघोज-अळकुटी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
माघील निवडणुकीत निघोज-अळकुटी गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र मध्यंतरी परस्थीती बदलली होती. राष्ट्रवादीमध्ये दुफळी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रीगणात उतरले. त्यामुळे काय होणार ही उस्तुकता सर्वांनाच लागली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पुन्हा निघोज-अळकुटी गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले,असल्याचे आ.काशिनाथ दाते म्हणाले.
लोकसभेचा पराभवाचा विधानसभेत वचपा
माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी या जिल्हा परिषद गटात सर्वाधिक विकासकामे देऊनही लोकसभा निवडणुकीत मोठें मताधिक्य विरोधी उमेदवारांना मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत मी विजयी होणार ही खात्री मला होती. सर्वांनाच बरोबर घेऊन काम करण्याची आपली पद्धत आहे. निघोज पंचायत समिती गणात ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद, ॲड . बाळासाहेब लामखडे, ज्ञानदेव लंके, रोहिदास लामखडे, शिवाजीराव सुकाळे, माजी सरपंच पांडुरंग येवले, रमेश वरखडे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत लोकसभा निवडणुकीतील वचपा काढीत चांगले मतदान घडवून आणले असल्याचे देखील आ.काशिनाथ दाते म्हणाले.
पक्षसंघटना मजबूत करण्याची गरज
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. यासाठी नवीन कार्यकर्ते पक्षात आले पाहिजे. त्यांना कार्यक्षम करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. केंद्र सरकार व राज्यात सत्ता हे सत्तेचे केंद्रबिंदू आपल्या हातात आहे. त्याच प्रमाणे उद्याच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवर आपलीच सत्ता आली पाहिजे, यासाठी पक्षसंघटना मजबूत झाली पाहिजे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा राजकीय दबदबा वाढण्यासाठी आपण सर्वांनी पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
-आ. काशिनाथ दाते
प्रस्थापित पुढारी पक्ष प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार,आ. काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी पक्ष प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उद्याच्या काळात मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. यामध्ये आणखीन भर टाकण्याची जबाबदारी कार्यकर्त्याची आहे.
– अशोक सावंत,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
मतदारसंघाचा विकास होणार; कवाद
ज्येष्ठ नेते प्रभाकरशेठ कवाद यांनी सुधामती कवाद यांना आमदार काशिनाथ दाते सर यांनी महिला आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष पद दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. तसेच सुधामती या आमच्या सुनबाई असून अतिशय कार्यक्षम व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सुधामती यांचा लौकिक असून राष्ट्रवादी महिला आघाडीचे संघटन करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे राहील अशी ग्वाही दिली. तसेच एक कार्यक्षम आमदार म्हणून दाते सर यांना राजकारण व समाजकारण यांचा पुर्वाश्रमीचा मोठा अनुभव लक्षात घेता मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.
कोट्यवधी रुपयांची विकासकामे
आ. काशिनाथ दाते यांनी जिल्हा परिषदचे सभापती म्हणून काम करताना जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करीत जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले. याचीच परिणती म्हणून जनतेने त्यांना आमदार केले. उपमुख्यमंत्री अजित दादा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते व महिला भगीनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर यांनी केले.
मतदारसंघाचा विकास होणार
गेली चाळीस वर्षातील दाते सर यांचा विनम्र स्वभाव व जनसंपर्क व त्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे याचा विसर जनतेला न पडता जनतेने त्यांना आमदार केले. अशा सुस्वाभावी व ज्येष्ठ मार्गदर्शक यांना आमदार होण्याची संधी मिळाल्याने ते संधीचे सोने करतील व मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी अपेक्षा बाजार समीतीचे माजी सभापती बबुशा वरखडे यांनी व्यक्त केली.
सुधामती कवाद कार्यक्षम महिला नेत्या
विधानसभा निवडणुकीत निघोज-अळकुटी गट महायुतीच्या पाठीशी उभा ठाकला. सुधामती कवाद यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबती घेऊन पक्ष प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीत किती मदत झाली यांची आम्हाला जाणीव आहे. सुधामती कवाद या संघटन करणाऱ्या कार्यक्षम महिला नेत्या असल्याचे आ.काशिनाथ दाते म्हणाले.
पाच वर्षांसाठी समाधानी
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त अनिल लंके यांनी सुत्रसंचलन करताना आमदार दाते सर पंधरा वर्षे आमदार म्हणून कार्यरत राहातील असे सांगितले यावेळी दाते सर यांनी अनेक नेतेमंडळी आमदार होण्यासाठी तयारीत आहेत. मी पाच वर्षांसाठी समाधानी आहे. यावर उपपस्थीतांनी जोरदार टाळ्या वाजवून दाते यांना दाद दिली.
मळगंगा यात्रेनिमित्त १० एप्रिल रोजी पाणी सोडा
मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त अनिल लंके यांनी आ. काशिनाथ दाते यांनी कुकडी डावा कालव्याला वेळेवर पाणी सोडण्याचा पाठपुरावा केला म्हणून आमदार दाते सर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी लंके यांनी दि.२१ एप्रिल पासून राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रा सुरू होत असून पाटपाण्या अंतर्गत असलेल्या गावात यात्रा असून भावीकांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी पुन्हा दि. १० एप्रिल रोजी पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
देर आये दुरुस्त आये
डी बी लाळगे कंट्रक्शनचे अध्यक्ष दत्तात्रय लाळगे हे विधानसभा निवडणुकीत दिसले नाही ही चर्चा या वेळी होत होती. यावेळी आमदार दाते सर व व्यासपीठावरील मान्यवरांनी लाळगे यांना शेजारी बसण्याची सुचना केली मान्यवरांच्या जवळच्या खुर्चीत ते बसले मात्र लाळगे हे देर आये दुरुस्त आये असे म्हणत आमदार दाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले या वेळी उपस्थीतांनीही टाळ्या वाजवून लाळगे यांचे स्वागत केले.