पारनेरला ६० तर अहिल्यानगर तालुक्याला ९ कोटींचा निधी / | नवनागापूरमधील कार्यक्रमात एक वर्षांतील विकासकामांचा आढावा /| आमदार दाते यांच्या वर्षपूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकमान्य आणि जनसंपर्कशील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार काशीनाथ दाते यांच्या आमदारकीच्या यशस्वी वर्षपूर्तीचा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम नवनागापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार दाते यांच्या जनसंपर्क, विकासदृष्टी आणि समाजाभिमुख कार्याची जनतेने घेतलेली दखल या सोहळ्यात पाहायला मिळाली. कार्यक्रमाचा उत्साहवर्धक माहोल हा आमदार दाते सरांवरील जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा जिवंत पुरावा होता. दरम्यान पारनेर तालुक्यातील गावांसाठी ६० कोटी तर नगर तालुक्यातील गावांसाठी ९ कोटींचा निधी दिल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यात शीतलताई संग्राम जगताप, सुमन काशीनाथ दाते, उद्योजक दिलीप दाते, अर्चना दिलीप दाते, अप्पासाहेब (बंडूनाना) सप्रे, वडगाव गुप्ताचे माजी सरपंच विजयराव शेवाळे, सुभाष दांगट, सागर सप्रे, दीपक गिते, डॉ. संजीव गडगे, ताराचंद डोंगरे, भाजप कार्याध्यक्ष रामभाऊ घाडगे, अप्पा पवार, हर्षद पटेल, राहुल सप्रे, महेश कांडेकर, धनराज सप्रे, सनी सप्रे, नरेश शेळके, रेणुका पुंड, नितीन खंदारे, हेमंत लगड, प्रतीक दादा शेळके, सोनूताई शेवाळे, सुशीला जगताप, संगीता भापकर, स्वाती सप्रे, मंगल गोरे, वंदना दांगट, पूजा सप्रे, रेणुका पुंड, सुमन सप्रे, शुभांगी भोराडे, आकाश कोल्हाळ, आकाश पवार, दीपक बरे, विशाल घोलप, शंकर पवार, अक्षय पिसे, रामभाऊ अडसुरे, श्रीकांत पवार, रोहित माने, विकास शिंदे, ऋषिकेश तागडकर, ऋषिकेश वाघ, सचिन शिंदे, विपुल भोसले, निखील शिंदे, अनमोल पुराणे, अविनाश पंडित, प्रतीक कवडे, अभिजीत सप्रे यांच्यासह परिसरातील महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
या प्रसंगी मतदारसंघातील पारनेर आणि नगर तालुयातील ४० गावांमध्ये एकाच वर्षात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षांत आमदार दाते यांच्या पाठपुराव्यामुळे पारनेर तालुयासाठी ६०२४.३५ लाख आणि नगर तालुयातील मतदारसंघात समावेश असलेल्या चाळीस गावांसाठी ९२८.२५ लाख, अशी एकूण ६९५२.६० लाख रुपयांची कामे मंजूर झाल्याची माहितीही उपस्थित जनतेसमोर यावेळी मांडण्यात आली. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, तांडा वस्ती सुधारणा, जनसुविधा, पर्यटन विकास, पंचायत सेवा-विस्तार अशा विविध क्षेत्रांमध्ये गतिमान झालेल्या शेकडो कामांमुळे मतदारसंघाच्या विकासाचा आलेख उंचावल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा हा उपक्रम. हजारो लाडया बहिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महिलांच्या सन्मानासाठी आयोजित केलेला हा उपक्रम आमदार दाते सरांच्या संवेदनशीलतेचा आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दलच्या आदरभावाचा उत्कृष्ट प्रत्यय देणारा ठरला. बहिणींनी उत्स्फूर्त सहभागातून व्यक्त केलेले प्रेम आणि आनंद या संपूर्ण सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आमदार काशीनाथ दाते सर मि मंडळ, नवनागापूर – वडगाव गुप्ता आणि स्थानिक ग्रामस्थांनी उत्कटतेने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक जनतेचा उत्साह आणि एकात्मता स्पष्टपणे जाणवत होती. दाते यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला विकासप्रवास आगामी काळातही अशाच पद्धतीने गतिमान होत राहो आणि मतदारसंघ प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहोचो अशा शुभेच्छा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिल्या.
जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्याचे प्रयत्न
हा वर्षपूर्ती सोहळा हा माझा नाही, तर पारनेर-नगर मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा उत्सव आहे. एका वर्षात केलेली कामे ही सर्वांची सामूहिक ताकद आणि जनतेच्या सहकार्यामुळेच शय झाली. ‘खेळ पैठणीचा’ उपक्रमात बहिणींनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. आगामी काळातही विकासकामांचा वेग आणखी वाढवून जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्याचे माझे प्रयत्न सुरूच राहतील.
-आमदार काशीनाथ दाते



