मुंबई। नगर सहयाद्री:-
जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही, अशा शब्दात महंत रामगिरी महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीता संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी रामगिरी महाराजांवर सडकून टीका केली होती. आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आहे. बॅनची मागणी कर ना बाबा! आता अति व्हायला लागलं, रामगिरीचं! इतिहास रामगिरीकडूनच शिकायचा देशानं? असा एकेरी उल्लेख करत आव्हाड यांनी टीका केली होती.
दरम्यान, आता आमदार जितेंद्र आव्हांडांच्याया टीकेला रामगिरी महाराजांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडासारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाही. इतिहास आहेच तो फक्त वाचण्याची गरज आहे. इतिहास काय आज लिहिलेला नाही. तो शिकण्याची आवश्यकता नाही. जो आहे तो इतिहास त्यांनी वाचण्याची गरज आहे पण त्यांना तो वाचायचा नाही हेच दुर्दैव आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रामगिरी महाराज आहे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीपूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्यासमोर गायल होतं. ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं तर ते जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं आपंलं राष्ट्रगीत आहे.