spot_img
ब्रेकिंगनगरच्या विकासासाठी पुन्हा 'गिफ्ट'! आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यांमुळे 'या' कामासाठी ९४ कोटी...

नगरच्या विकासासाठी पुन्हा ‘गिफ्ट’! आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यांमुळे ‘या’ कामासाठी ९४ कोटी मंजूर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरच्या विकासासाठी राज्यशासनाने नव्याने ९४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. नगर शहरासह भिंगारचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे बम्पर गिफ्ट दिले आहे. नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा, विकासकामांसाठी राज्य शासनाने ८५ कोटी रुपयांचा तर भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही आ. जगताप यांच्या माध्यमातून विकासकामांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक शुशोभीकरण तसेच अन्य विकासकामे होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी नुकताच पहिल्या टप्यातील १५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नगर शहरात वेत्या काळात जवळपास २३५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून ९ कोटींचा भरीव निधी मिळाला आहे त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे.

आ. जगतापांचा राजकीय निर्णय नगरसाठी लाभदायी
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. त्यावेळी आ. संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच पवारांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी लाभकारक ठरला आहे. पवारांनी आ. जगताप यांच्या प्रस्तावानुसार नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोडले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने चालना मिळाली.

भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदलेल
शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्लीपर्यंत विषय जातो. अशावेळी भिंगारमध्ये काम करताना प्रचंड मेहनत करावी लागते. मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकासकामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतया मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...